हुंबरट येथील वसंत उर्फ बापू दळवी यांचे निधन
हुंबरट दळवीवाडी येथील रहिवासी कै.वसंत महादेव दळवी उर्फ बापू दळवी यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी 10 सप्टेंबर रोजी निधन झाले.
बापू या नावाने ते सर्वत्र परिचीत होते.
हुंबरट पंचक्रोशीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवस्थानचे प्रमुख मानकरी म्हणून त्यांची ओळख आहे.गावच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. शांत व प्रेमळ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते.त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे गावातील एक सामाजिक कार्यक
र्ता हरपला अशी अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पाश्चत पत्नी,दोन मुलगे,सात विवाहित मुली,भाऊ,पुतणे, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी