‌मोठी महत्वाकांक्षा बाळगून पुर्ततेसाठी कठोर मेहनत घ्या-जयंत देशपांडे

आचरा–अर्जुन बापर्डेकर
कोणतीही कला,खेळ एकाग्रता वाढवित असते.विद्यार्थ्यानी मोठी महत्वाकांक्षा बाळगून ती पूर्ततेसाठी कठोर मेहनत घेतली तर यश दूर नसल्याचे उद्गार मुंबई येथील सुप्रसिध्द उद्योजक जयंत देशपांडे यांनी आचरा हायस्कूल येथे काढले. इंग्लिश मेडिअम स्कूल येथे सोमनाथ गुळगुळे संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन जयंत देशपांडे यांच्या हस्ते झाले त्यानंतर आयोजित
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराच्या विद्यार्थी
गुणगौरव सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे अध्यक्ष प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष तसेच इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचराचे अध्यक्ष प्रदीप परब मिराशी,उप कार्याध्यक्ष मोहम्मद इक्बाल काझी,सचिव अँड सुभाष आचरेकर, कोषाध्यक्ष मंगेश आचरेकर,सौ वंदना देशपांडे,राजन गुळगळे,सौ सुनीता गुळगुळे, सचिन गुळगुळे,सौ चित्रा गुळगुळे तसेच स्थानिक स्कूल समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी यांनी सांगितले की स्वतःला कमी लेखू नका मनातील न्यूनगंड बाजूला सारून यश संपादन करण्याचे आवाहन केले. तर कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्याच्या उत्कर्षासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. संस्थेचे सचिव सुभाष आचरेकर यांनी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक तयारी माध्यमिक स्तरापासून होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला.

error: Content is protected !!