खारेपाटण येथील महसुली गावांचा एकेरी उल्लेख टाळून

नामविस्तार करून महापूरुषांचा आदर करावा-रमाकांत राऊत
खारेपाटण ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शिवाजी पेठ व संभाजी नगर या दोन महसुली गावांच्या नावामध्ये चुकीची महसुली एकेरी नोंद असल्याने त्यामध्ये ताबोडतोब बदल करून यापुढे छत्रपती शिवाजी महाराज पेठ व छत्रपती संभाजी महाराज नगर असा त्याचा नामविस्तार करण्याची लेखी मागणी खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने नुकतीच शासनाकडे केली आहे.
याबाबत श्री राऊत यांनी नुकतीच कणकवली प्रांत अधिकारी श्री जगदीश कातकर व तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन खारेपाटण येथील २ महसुली गावांच्या नावात बदल करण्याचे लेखी मागणीचे निवेदन सादर करून
महापुरूषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ५ महसुली गाव येत असून यापैकी शिवाजी पेठ व संभाजी नगर या दोन गावांच्या नावात आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचे तथा राष्ट्रपुरुषांच्या नावांचा उल्लेख असल्याने शासनाच्या महसूल नोंद रजिस्टरला महापुरूषांच्या एकेरी नावाचा उल्लेख असल्याने ही बाब मापुरूषांचा अनादर व अवमान करणारी असून सदर महसुली गावांचा तातडीने नामविस्तार करून महापुरुषांचा आदर करावा असे देखील श्री राऊत यांनी लेखी निवेदनात म्हंटले आहे.