कणकवली बाजारपेठेतील सुरेश तायशेटे यांचे निधन

शहरातील बाजारपेठ येथील रहिवासी सुरेश आत्माराम तायशेटे 82 यांचे वृद्धपकाळाने रविवारी पहाटे निधन झाले. सुरेश तायशेटे यांनी मुबंई मध्ये काही वर्षे औषध कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर ते कणकवली येथे राहत होते. शांत मितभाषी स्वभावामुळे ते शहरात परिचित होते.स्व.ज्येष्ठ पत्रकार शशी तायशेटे यांचे ते पुतणे होत. त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा,विवाहित दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे