भिरवंडे कदमवाडी येथील ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश

उबाठा विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना मोठा धक्का
भिरवंडे येथील उबाठा चे कार्यकर्ते व भिरवंडे विकास सोसायटी चे संचालक संजय उर्फ छोटु कदम व भिरवंडे कदम वाडी येथील ग्रामस्थानी नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, सौं संजना सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजू पेडणेकर, मयुरी मुंज, मीनल पवार राजश्री पवार,आदी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे यांची विकास कामे करण्याची कार्यपद्धती तसेच माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत व सौं संजना सावंत यांची गावच्या विकासासाठी असलेली तळमळ याने प्रेरित होऊन कदम वाडी च्या विकासासाठी आम्ही भाजप मध्ये प्रवेश करीत आहोत असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.