पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूल मधील कु.स्वरा मिलिंद डोळ शिष्यवृत्तीसाठी पात्र

फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील कुमारी स्वरा मिलिंद डोळ या विद्यार्थिनीने 70.66 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 73 व्या क्रमांक प्राप्त केला आहे. या यशामुळे स्वरा ला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. स्वराच्या या यशामध्ये तिला मार्गदर्शन करणारे खारेपाटण हायस्कूल मधील शिक्षक श्री. ठाकूर सर व सौ. अमृते मॅडम यांचे मोलाचे योगदान आहे. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे सचिव श्री. महेश जी कोळसुलकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक श्री.संजय सानप, पर्यवेक्षक श्री राऊत सर व शिक्षक वर्ग यांच्याकडून स्वराचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.