खारेपाटण महाविद्यालयात एन डी आर एफ टीम च्या वतीने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एनसीसी व विद्यार्थी कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) च्या जवानांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख श्रीमती राजश्री सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांनी आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाची सुरुवात केली. छत्रपती खांदवे यांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण स्पष्ट केले.
या प्रशिक्षणात ए.एस.आय. विजय म्हसके, ए.एस.आय. दुर्वेश कुमार, हवालदार प्रदीप पाटील, हवालदार झेंडे, हवालदार फापले, हवालदार श्रीमती उज्वला फडतरे, कॉन्स्टेबल अजहर सय्यद, कॉन्स्टेबल गौरेश थवकर, कॉन्स्टेबल संदीप, कॉन्स्टेबल श्रीणू बाबू, कॉन्स्टेबल शानमुखा, कॉन्स्टेबल विकास, कॉन्स्टेबल शरद व कॉन्स्टेबल श्रीमती प्रीती कुमारी यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
या प्रसंगी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत,ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री अजय गुरसाळे खारेपाटण गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांची उपस्थिती कार्यक्रमास बळकटी देणारी ठरली. गावातील नागरिकांनी आणि विद्यार्थी वर्गाने कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात केल्या.
या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक उपचार, बचाव कार्य, सुरक्षित स्थळी स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना, जलतरण सहाय्य, इमारतींच्या दुर्घटना यासंबंधीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक NDRF पथकाने सादर केले. हे प्रात्यक्षिक उपस्थितांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरले.तर महाविद्यालयाच्या वतीने सहभागी जवानांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळातील सजगता, तत्परता व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली. महाविद्यालयाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचाही हा एक भाग ठरला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रम अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री वसीम सय्यद यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्रीमती रश्मी देसाई यांनी करून दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री प्रणय माने यांनी केले.