कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा 13 जुलै रोजी

संस्थेच्या फोंडाघाट येथील ‘पूर्णानंद भवन’ येथे होणार कार्यक्रम

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीतील सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता संस्थेच्या फोंडाघाट येथील ‘पूर्णानंद भवन’ येथे होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वेतोरे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर उपस्थित राहणार आहेत.
या गुणगौरव कार्यक्रमात सन २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक व इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या आणि सर्व स्पर्धात्मक, एन.टी.एस., एम.टी.एस., बी. डी.एस., ऑलिम्पीयाड इ. परीक्षेत कणकवली तालुक्यात १ ते ३ क्रमांक प्राप्त करणा-या गुणवंतांसह कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रामध्ये व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत पाचवी व आठवी इयत्तेत २१० गुण व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन विशेष प्रविण्य संपादित केलेले गुणवंत व सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व पुरस्कार प्राप्त ज्ञातीबांधवांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. यावेळी ज्ञाती बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत, उपाध्यक्ष विद्याधर केळुसकर व कार्यवाह अँड एन. आर देसाई यांनी केले आहे.

error: Content is protected !!