… अखेर पालकमंत्री नितेश राणे सतीश सावंत एकत्र!

सिंधुदुर्गात राजकीय घडामोडी घडणार?
यापूर्वी एकमेकांच्या विरोधात विधानसभा उमेदवारीसाठी एकत्र ठाकलेले व पालकमंत्री नितेश राणे यांचे एकेकाळीचे सहकारी परंतु आताचे कट्टर विरोधक समजले जाणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे आज कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी सतीश सावंत यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणे यांची व्यासपीठावर चर्चा झाली. व हास्य विनोद देखील झाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत देखील उपस्थित होते. त्यामुळे ही भविष्यातील सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणांची नांदी म्हणावी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान कार्यक्रमाचे निमित्त जरी शैक्षणिक असले तरी दोन राजकीय परस्परविरोधी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील यापूर्वीचा इतिहास व राज्याच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते शक्यता नाकारता येत नाही. तसेच सतीश सावंत यांना सहकार क्षेत्रात विशेष रस आहे. तसेच येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या एकत्र येण्याला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षात पालकमंत्री नितेश राणे व सतीश सावंत हे एकाच व्यासपीठावर जाहीररीत्या आल्याचे दिसले नाही. परंतु आता ते जाहीर रित्या एका व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.