कुरंगवणे बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत च्या हद्दीत येणारा “देवाचा झरा (खैराटमार्गे) – शिडवणे रस्ता अत्यंत बिकट अवस्थेत

कुरंगवणे बेर्ले गृप ग्रामपंचायत च्या हद्दीत येणारा “देवाचा झरा (खैराटमार्गे) – शिडवणे” ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा ग्रामीण मार्ग क्रमांक ३७ ची निर्मिती अंदाजे ३०-३५ वर्षापुर्वी आम. गोगटे असताना झाली. त्याचवेळी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुद्धा करण्यात आले. त्यामुळे कुरंगवणे गावातील खैराट विभागातील वसलेल्या चारही वाडीतील रहीवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न काही वर्षांसाठी का होईना पण मार्गी लागला‌. परंतु ठराविक काळ निघून गेल्यावर या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आलं, डांबरीकरण निघून गेल्यामुळे खडी निघून या रस्त्याची स्थिती एखाद्या सुकलेल्या नदी पात्रा सारखी होऊ लागली, याचं मुख्य कारण हेच की, ह्या रस्त्याकला कोणी वाली नाही अशी अवस्था दिसून येत आहे.यामुळे आज ह्या गावजोड रस्त्याची परिस्थिती अशी गंभीर झालेली दिसून येत आहे. सदर रस्त्यावरून शिडवणे कडे जाताना वाहनधारक कायमच प्रवाशी भाडे नेण्यास कायम नकार देतात, यांचे मुख्य कारण म्हणजे ह्या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि रस्त्याच्या आजूबाजुची वाढलेली अन् रस्त्यावर आलेली झूडपे हेच आहे. हा रस्ता शिडवणे – नाधवडे मार्गे पुढे जाऊन “वैभववाडी रोड” रेल्वे स्थानकाकडे जात असल्याने ह्या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी तथा पुनर्बांधणी साठी ग्रामपंचायत कडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. पण ह्या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि या रस्त्याच्या कामासाठी मंजूर होणारा (मागच्या २ वर्षापुर्वी मंजूर झालेला) निधी अत्यंत कमी असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आजही पुर्णत्वास गेलेलं नाही, त्यामुळे ह्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी तात्पुरतं अर्धवट करण्यात आले पण त्यानंतर उर्वरित रस्त्याच्या कामाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले. तरी कुरंगवणे खैराट मधील तमाम रहीवाशांतर्फे मा. आमदार साहेब तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेशजी राणे यांना नम्र विनंती आहे की, आपण या ग्रामीण मार्गाचे काम “मुख्यमंत्री ग्रामसडक योजने” मधून मंजूर करून घ्यावे आणि ह्या ग्रामीण मार्गाचे पुनर्बांधणीचे काम लवकरात लवकर करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या रस्त्या संदर्भात सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, “पालकमंत्री नितेश राणे यांनी या रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक करण्यात येईल असा शब्द दिला आहे. असे सांगण्यात आले. “

error: Content is protected !!