फोटोग्राफर नितीन उर्फ बाबू मुसळे यांचे निधन

कलमठ-बाजारपेठ येथील रहिवाशी व फोटोग्राफर नितीन उर्फ बाबू दत्ताराम मुसळे (४७) यांचे रविवारी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी काही काळ फोटोग्राफी व्यवसाय केला. त्यानंतर कलमठ-बाजारपेठ येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायावर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. गेले काही दिवस नितीन हे आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बाबू नावाने तो सर्वत्र परिचित होता. हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून नितीन यांनी फोटोग्राफी व वडापाव विक्रीच्या व्यवसाय आपला जम बसवला. नितीन हे मनमिळावू व परोपकारी स्वभाव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. कलमठ-बिडयेवाडी येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!