आयडियल च्या विद्यार्थ्यांची फुटबॉल मैदानावर दमदार कामगिरी

“सुब्रतो मुखर्जी”जिल्हास्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाची अद्भुतपूर्व कमाई.

कणकवली/मयूर ठाकूर

वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव कुडाळच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या 54 व्या सुब्रोतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या 17 वर्षाखालील मुलांच्या गटाने उपविजेते पदाची शानदार कामगिरी करत आपल्या शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे.
शौर्य,सहकार्य आणि खिलाडू वृत्तीचे अद्वितीय दर्शन घडवत आयडियल इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रारंभीच्या फेरीपासून अचूक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण केले, प्रत्येक सामन्यात कुशल पासिंग,अचूक गोलिंग आणि रक्षणात्मक कौशल्याने उपस्थितांची टाळ्यांची थाप वसूल केली. स्पर्धेच्या अंतिम फेरी संघर्षाची पराकाष्टा करत कुडाळ हायस्कूलच्या संघासमोर दर्जेदार खेळत करत उपविजेते पदावर नाव कोरले.
या यशासाठी खेळाडूंना प्रशाला क्रीडा शिक्षक योगेश सामंत सर,वासुदेव दळवी सर, तसेच कु.वैभव कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या अपूर्व यशामुळे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या झेंडा जिल्हास्तरावर फडकत असून भविष्यासाठी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांकडून आणखी विक्रमाच्या यशाच्या प्रतीक्षेत जिल्हा आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार डी.पी तानावडे सर ,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम,सर्व शिक्षक व शक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!