शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण व माध्यमिक /उच्च माध्यमिक गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

त्याग,सेवा व समर्पण हे ब्रीदवाक्य अव्याहतपणे जोपासत ‘शिवगर्जना मित्र मंडळाने’ आपल्या समाजसेवेचा एक आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय! जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत नुकताच हा शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा संपन्न झाला. रवींद्र जठार साहेब, (माजी वित्त व बांधकाम सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी नडगिवे गावच्या सरपंच माननीय सौ.माधवी मण्यार,सन्मा.श्री.भूषण कांबळे (उपसरपंच)श्री.प्रशांत धावडे( ग्रा.पं सदस्य )श्रीम.लता हिवाळकर (ग्रा.पं.सदस्य) श्री. सद्गुरू कुबल (केंद्रप्रमुख सावडाव)श्री.सतीश कर्ले (अध्यक्ष शा.व्य. समिती) सौ.साक्षी आंबेलकर (उपाध्यक्ष), मान.श्री.अमित सावंत (अध्यक्ष,शिवगर्जना मित्र मंडळ) मान.श्री.रवींद्र सुतार (सदस्य व्य. स.)श्री. जितेंद्र मण्यार (पोलीस पाटील)श्री.सुनील कर्ले (तंटामुक्ती अध्यक्ष) श्रीम.अनिता पाटकर (मुख्याध्यापक) श्रीम. प्रभा अकिवाटे,श्रीम.चौधरी मॅडम, श्री.श्रीधर मण्यार, श्री.अमित मांजरेकर(माजी सरपंच) श्री.भावेश कर्ले, श्री. संजय मण्यार, श्री.अमोल कर्ले, श्री.संतोष मंगरुळे, श्री.सतीश सुतार ,शिवगर्जना मित्र मंडळाचे सर्व सदस्य,ग्रामस्थ,पालक वर्ग,विद्यार्थी वर्ग बहुसंख्य उपस्थित होते.*
याप्रसंगी जठार यांनी या मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे हे मंडळ असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध स्तरावर उल्लेखनीय काम करत आहे. त्यांच्या सर्व कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा!*
सदगुरू कुबल (केंद्रप्रमुख)यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. आपण राबवत असलेला हा उपक्रम अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा परिपूर्ण होतील* माधवी मण्यार(सरपंच) आपल्या मनोगतात म्हणाल्या की, या मंडळाने केलेले हे सामाजिक कार्य सेवाभावी वृत्तीचे आहे. हा वसा वारसा असा चालू ठेवावा. विद्यार्थ्यांनीही या शैक्षणिक साहित्याचा योग्य विनियोग करावा. आपले शैक्षणिक कार्य उत्तुंग करावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मान.श्री. अरुण कर्ले तर सूत्रसंचालन श्री. संदीप कदम यांनी केले.

error: Content is protected !!