पिरामल स्वास्थ संस्थे तर्फे कुरंगवणे येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

गावातील ४० रुग्णांची करण्यात आली तपासणी

कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुकतेच पिरामल स्वास्थ संस्थे तर्फे सनोफी आणि सेहत ओके लिज प्रोजेक्ट अंतर्गत उच्च रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.या शिबिरात गावातील सुमारे ४० ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली.
गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुव्यवस्थित रहावे व त्यांना गावातल्या गावातच तपासण्या व्हाव्यात तसेच रुग्णांना येणारा आर्थिक भार कमी व्हावा.हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आल्याचे कुरंगवणे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे यांनी यावेळी सांगितले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उपसरपंच श्री बबलू पवार
ग्रा.पं.सदस्य श्री रवींद्र पवार,श्रीम. विशाखा राऊत,ग्रामविकास अधिकारी श्री गिरीश धुमाळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री महेंद्र कदम,आशा स्वयंसेविका श्रीम. वैष्णवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच या आरोग्य शिबिराकरीता आरोग्य विभागा मार्फत श्रीम काजल पडवळ
मयुरी खानविलकर,श्री स्वप्नील ईसवलकर,श्रीम.मृणाली सुतार यांनी रुग्णाच्या विविध आजारांचाच्या तपासण्या करून सहकार्य केले.

error: Content is protected !!