वैभववाडी पोलिसांची दमदार कामगिरी

अवैध गोवा बनवटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीसहित 13,04,000 चा मुद्देमाल जप्त

वैभववाडी तालुक्यातील कुसूर पिंपळवाडी फाटा,येथे महिंद्रा बोलेरो चार चाकी गाडीतून रात्री गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.अय्याज शहा आलम पठाण वय-34 वर्षे रा. घानेगाव,ता. बार्शी सोलापूर,जि. सोलापूर
व सोमनाथ भीमराव कसबे वय-37 वर्षे, रा. रामहिंगणी , ता. मोहोळ, जि. सोलापूर या आरोपीची नावे आहेत. त्यांच्याकडून 800000/- एक महिंद्रा बोलेरो पिकप चार चाकी वाहना सह 5,04000 किंमतीच्या गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. , एकूण-13,04,000/-रुपये मिळून असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी 12जुलै रात्री 10:10 वाजण्याच्या सुमारास मौजे कुसूर पिंपळवाडी फाटा, वैभववाडी येथे करण्यात आली. येथे वैभववाडी पोलिसांना गोपनिय बातमी दाराच्या अनुशंगाने माहीती मिळाली होती.त्यानुसार वैभववाडी पोलिसांचे पथक गस्तीवर होते. या दरम्यान कुसूर पिंपळवाडी फाटा, येथे पोलिसांनी चपळाईने त्यांना पकडले. गाडीची पाहणी केली असता गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स भरलेले होते. त्यांना वैभववाडी पोलीस ठाणे येथे आणून पंचनामा करून सुमारे 8,00000 किंमतीच्या बोलेरो गाडी सहित 504000 रु. किंमतीची गोवा बनवटीची दारू असा एकूण-13,04,000/-रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कलम 65(a), 65(e), 81,83प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई वैभववाडी पोलीस निरीक्षक -मनोज सोनवलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली –
सपोफौ/राजन पाटील,पोना/उध्दव साबळे,पोकॉ/अजय बिल्पे
पोकॉ/हरीष जायभाय
पोकॉ/किरण मेथे
मपोकॉ/योगिता जाधव..पोकॉ/संतोष माने
पोकॉ/रघुनाथ जांभळे यांनी केली.

error: Content is protected !!