गांधीनगर (खलांतर ) येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

सतीश सावंत यांना संदेश सावंत यांनी दिला पुन्हा एकदा धक्का

शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचे खंदे समर्थक भिरवंडे विकास सोसायटी चे व्हाईस चेअरमन व गांधीनगर गावचे माजी सरपंच चंद्रशेखर सावंत, गांधीनगर गावचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र उर्फ बाळा सावंत, माजी सरपंच सतीश सावंत,गुरुप्रसाद सावंत व गांधीनगर गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ॐ गणेश निवास्थानी भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, माजी जि प अध्यक्षा सौं संजना सावंत गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजू पेडणेकर, मयुरी मुंज राजश्री पवार मीनल पवार आदी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे यांनी गांधीनगर गावासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहेच परंतु उर्वरित विकास कामे ही नितेश राणे यांच्या माध्यमातून व माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व सौं संजना सावंत यांचा सतत असलेला पाठपुरावा यामुळे विकास कामे गावात होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजप मध्ये प्रवेश करीत असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!