मुंबईच्या रचना संसद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली ठाकर लोककलेची माहिती

पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाला भेट
पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी दिली माहिती
निलेश जोशी । कुडाळ : मुंबई येथील रचना संसद कॉलेज यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयला भेट दिली. यावेळी त्यांनी एक दिवसीय चित्रकथी व चित्रशैली कार्यशाळा व कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा आनंद घेतला.
शैक्षणिक सहली निमित्त मुबई येथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरीला भेट द्यायला आले होते. Contour Travels च्या मदतीने हे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक वारसा शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. ठाकर समाजाची लोककला आणि त्याचा इतिहास हा खूप प्राचीन आहे आणि त्याचे जतन संवर्धन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले या बद्धल कॉलेजच्या वतीने त्यांचे आभार मानले. तसेच सर्व विद्यार्थी प्राचीन लोककला प्रशिक्षण घेतले. पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्यांना ठाकरे लोककलेची माहिती दिली.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.