उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग(RTO) यांच्यावतीने NCC निवासी शिबिरामध्ये करण्यात आले रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची विशेष उपस्थिती
रस्ते सुरक्षा विषयक प्रश्न मंजुषा घेण्यात येवून विजेत्यां विद्यार्थ्यांना देण्यात आली पारितोषिके
ओरोस येथे NCC विभागाचा 14 दिवसांचा निवासी कॅम्प सुरु असून त्या ठिकाणी RTO कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा विषयक लेक्चर घेण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज शनिवार दि. 20/12/2025 रोजी NCC निवासी शिबिरामध्ये रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन लेक्चर घेण्यात आले. एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री अजय राज व लेफ्टनंट कर्नल श्री. मंडलिक हे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान रस्ते अपघात टाळण्यासाठीच्या कार्यवाही चे सादरीकरण करताना, पादचारी सायकलस्वार यांनी घ्यावयाची काळजी या विषयांचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य भर रस्त्यावर पादचाऱ्यांची सुरक्षितता, रात्रीच्या अंधारात तसेच घाट रस्त्यांमध्ये सुरक्षितपणे सायकल व पादचाऱ्यांनी रस्त्याचा वापर कसा करावा, बस मध्ये प्रवास करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दुचाकीस्वारासाठी हेल्मेटचे व चारचाकी वाहनांसाठी सीटबेल्टचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात रस्ते सुरक्षा विषयक प्रश्न मंजुषा घेण्यात येवून त्यातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाची सांगता रस्ते सुरक्षिततेची शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय काळे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री. अरुण पाटील, श्री. मितेश माने हे उपस्थित होते.





