कु.रजत तोरसकर याने टेबल टेनिस विद्यापीठ राष्ट्रीय पश्चिम विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेपाठोपाठ जयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत यश.

कु.रजत तोरसकर याचा समावेश असलेल्या नागपूर विद्यापीठ पुरुष संघाने जयपूर येथे संपन्न झालेल्या विद्यापीठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (आरटीएमएनयू) पुरुष टेबल टेनिस संघाने चमकदार कामगिरी करीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस अजिंक्यपद २०२५-२६ मध्ये सुवर्णपदक जिंकले. ही स्पर्धा १५ ते १९ डिसेंबरपर्यंत जयपूर येथील महात्मा जोतिबा फुले विद्यापीठात पार पडली. उपांत्यपूर्व फेरीत नागपूर विद्यापीठाने गुजरातमधील मारवाडी विद्यापीठाचा ३-२ असा पराभव केला. उपांत्य फेरीत संघाने एसआरपीएम नांदेड विद्यापीठाचा ३-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत आरटीएमएनयूने सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ३-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. विद्यापीठाच्या कुलगुरू मनाली क्षीरसागर आणि क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संभाजी भोसले यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल संघाचे अभिनंदन केले. नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड येथील राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेमध्ये सुद्धा नागपूर विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले होते.गेल्या वर्षी पार पडलेल्या खेलो इंडिया विभागीय विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये रजत पदक मिळविले होते. तसेच नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते.सलग मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून रजत तोरसकर आणि त्याच्या संघाचे अभिनंदन होत आहे. रजत तोरसकर हा मालवण येथील अ.शी.दे टोपीवाला हायस्कूल तसेच स.का. पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे. त्यांनी टेबल टेनिसचे प्राथमिक धडे प्राथमिक धडे मालवणीतील कोरगावकर टेबल टेनिस अकादमी मध्ये गिरवले होते.
रविकिरण चिंतामणी तोरसकर
9422633518





