निकाल उद्या, पण आजच विजयी रॅलीच्या परवानगीसाठी कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात

शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली विचारणा

विजयाची 100 टक्के खात्री असल्याचा दोन्ही बाजूने दावा

कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार असताना आता दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. यातच कणकवली शहर विकास आघाडी कडून आज कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये विजयी मिरवणुकीच्या करिता परवानगीची मागणी करण्यासाठी चौकशी करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. शंभर टक्के विजयाची खात्री असल्याने ही विजयाची रॅली काढण्याकरिता परवानगी मागितल्याचे सांगितले जात आहे. मात्र निकालानंतरची परवानगी दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे अद्याप गुलदस्त्यात असताना मात्र शहर विकास आघाडी ला असलेल्या विजयाच्या खात्रीतून विजय रॅली करिता परवानगी मागितली जात असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडून भाजपच्या पॅनल कडून देखील 100% विजयाची खात्री असल्याचे सांगितले जात आहे.मात्र निकालापूर्वीच विजयी रॅली करता मागितलेल्या परवानगीची चर्चा मात्र शहरात सुरू झाली आहे. एकीकडे ही चर्चा असताना दोन्ही बाजूंनी विजयी मिरवणुकीच्या तयारी करता कार्यकर्ते कामाला लागल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!