फोंडाघाट मधील प्रतिष्ठित व्यापारी भाई मोदी यांचे दुःखद निधन

    फोंडाघाट मधील जेष्ठ प्रतिष्ठित होलसेल मालाचे व्यापारी रमेश उर्फ भाई जगन्नाथ मोदी (७१ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री 11 वा. च्या दरम्याने वृद्धापकाळाने आजाराने राहत्या घरी आकस्मित निधन झाले.
      कै. भाई मोदी यांचा मितभाषी – मिस्कील स्वभाव आणि चेहऱ्यावर स्मितहास्य, अजातशत्रू व ग्राहकाशी सलोख्यामुळे लोकसंग्रह आणि मित्र परिवार मोठा होता.
त्यांचे पश्चात मुलगा सिद्धेश, मुलगी युगा, तीन भाऊ, वहिनी, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.  फोंडाघाट एज्यु. सोसायटी चे संचालक सुहास मोदी याचे ते मोठे बंधू होत.
त्यांच्या निधनानंतर सकाळी ११ वाजता निघालेल्या अंतयात्रेमध्ये सर्व स्तरातील भाई मोदी प्रेमी वैकुंठ भूमीपर्यंत उपस्थित होते. तेथे त्यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!