डोंबिवलीतील कोकण महोत्सवात चिंदरची दिंडी!

लोकसेवा समिती डोंबिवलीच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोकण महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या दरम्यान अरुणोदय सोसायटी ( चिनार मैदान), महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता डोंबिवलीचे आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाट्न होणार आहे.
24 डिसेंबर रोजी मालवण तालुक्यातील चिंदर गांवठणवाडीची श्री आकारी ब्राह्मदेव प्रासादिक भजन मंडळाची पारंपरिक दिंडी सहभागी होणार आहे. जयवंत ऊर्फ भाई तावडे, पखवाज – प्रथमेश तावडे, तबला – तेजस घाडी यांचे सुमधुर संगीत आणि पंढरीचा पांडुरंग, संत तुकाराम हे या दिंडीचे खास आकर्षण असेल. सर्व डोंबिवलीकरानी या वारकरी दिंडीत सामील होऊन हरिभजनाचा आंनद घ्यावा, असे आवाहन लोकसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम नाटेकर, अध्यक्ष रामचंद्र परब, सचिव चारुदत्त राणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!