कुडाळात २१ डिसेंबरला कु. कस्तुरी पाताडे श्रद्धांजली बैठक

डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधातही चर्चा होणार
कासार्डे येथील कु. कस्तुरी पाताडे हिचा डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू प्रकरणी चर्चा आणि कु. कस्तुरी हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ मधील जागरूक नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २१ डिसेंबर ४ वाजता कोर्टानाजीकच्या श्री गणपती मंदिरात कुडाळ शहरातील सजग नागरिकांची ही बैठक होणार आहे. नागरिकांनी मोठया संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कु. कस्तुरी पाताडे व त्यानंतर हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मयताच्या नातेवाईकांना दिलेली उद्धट वागणूक व त्यानंतर घडलेल्या उस्फूर्त जन उद्रेक, हाॅस्पिटलची किरको॓ळ तोडफोड. नंतर तोडफोडी विरोधात जिल्हाभरातील खाजगी डाॅक्टरांनी निषेध करत आपली बंद ठेवलेली OPD या सर्व संवेदनशील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री गणपती मंदिर, कोर्टाच्या बाजूला जागरूक सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या ही वेळ आपल्यावर किंवा आपल्या प्रियजनांवर येईल. म्हणून संवेदनशील राहुन जनतेची एकी दाखवुया असे आवाहन कुडाळ शहरातील जागृक सजग नागरीकानी केले आहे.





