जलजीवन मिशन योजनेमधुन हेदुळ कानडेवाडी येथे नळयोजनेचा शुभारंभ

हेदुळ सरपंच सौ. प्रतीक्षा पांचाळ यांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन

पोईप : गेली कित्येक वर्षे कानडे वाडीची मागणी असलेले नळयोजनेचा काम आज जलजीवन मिशन मधुन मंजुर झाले. माजी सरपंच नंदादीपक गावडे यांनी पाठपुरावा करून हे काम मंजुर करून आणले आहे या वाडीतील लोकांनी समाधान व्यक्त केले. जलजीवन मिशन योजनेमधुन हेदुळ कार्यक्षेत्रातील कानडे वाडी नळ योजना कामाचे हेदुळ सरपंच प्रतीक्षा पांचाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपसरपंच श्री नंदकिशोर सावंत ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश पुजारे, सौ शेमडकर, सौ. प्रीती सावंत माजी सरपंच नंदू गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भगवान कानडे श्री सत्यवान गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संतोष हिवाळेकर / पोईप

error: Content is protected !!