संदेश पारकर यांच्या विजयानंतर उद्योग मंत्री उदय सामंत उद्या कणकवलीत

शहर विकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांचा करणार सत्कार
कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व त्यांच्यासोबत आठ नगरसेवकांचा दणदणीत विजय झाल्यानंतर या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्याकरता राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत हे उद्या 22 डिसेंबर रोजी कणकवलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. कणकवली येथे शिवसेना नेते राजन तेली यांच्या निवासस्थानी दुपारी 3 वाजता या सर्व विजयी उमेदवारांचा त्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्या या दौऱ्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





