कुडाळ रोटरीच्या फेस्टिवलमध्ये भरगच्च कार्यक्रम

29 ते 31 डिसेंबर रोजी आयोजन
संस्कृतिक कार्यक्रमांसह इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो
रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानवर दि. 29,30 व 31 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत फेस्टिव्हलचे उदघाटन होईल. रोज सायंकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत फेस्टिव्हल असेल. ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात २०२५ला निरोप देऊन २०२६ च स्वागत केले जाईल, अशी माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने यांनी दिली. शनिवारी रात्री कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, रोटरी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष ॲड राजीव बिले, राजन बोभाटे, शशिकांत चव्हाण, गजानन कांदळगावकर, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर आदी उपस्थित होते.
सचिन मदने म्हणले, या फेस्टीव्हल मध्ये विविध इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो मध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
रोटरी महोत्सवला वामन हरि पेठे ज्वेलर्स प्रमुख प्रायोजक तर सारस्वत बँक, क्रांती सिरॅमिक सहप्रायोजक आहेत. या महोत्सवाला डाॅ जी टी राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कोकण कॅन्सर मल्टीस्पेशालिस्ट हाॅस्पिटल, संजिवनी एंटरप्रायजेस, ॲक्युरेट इंजिनिअरिंग वर्क्स, इन्स्पायर सायकल, तिरूमला तिरूपती. मल्टीस्टेट को ऑप सोसायटी आदी महोत्सव प्रायोजक पार्टनर आहेत.अजूनही प्रायोजक पार्टनर साठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष सचिन मदने यानी सांगितले.
२९ डिसेंबरला नृत्य, हास्य सुरांचा संगम कार्यक्रमात सुर नवा ध्यास नवा फेम गायक निखिल मधाळे, झी युवा सिंगर फेम गायिका ब्रम्हनंदा पाटणकर व गायक हर्षद मेस्त्री असणार आहेत तर विनोदाचा बादशहा दिव्येश शिरवडकर असणार आहे.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा 5 ते 11 आणि 12 ते 16 वयोगटात 30 स्पर्धकांपूरतीच मर्यादित असणार आहे.
30 डिसेंबर रोजी 65 कलाकारांचा साई कला मंच निर्मित रंगी रंगला महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी इनर व्हील क्लब ऑफ कुडाळ आयोजित मोड आलेल्या कडधान्यांवर आधारित पाककला स्पर्धा होणार आहे.
31 डिसेंबर रोजी साई जळवी फिल्म प्रस्तूत अफलातून मनोरंजनाचा धुमधडाका कार्यक्रम होणार आहे.यामध्ये सुपरस्टार संतोष जुवेकर, तू आभाळ फेम पार्श्वगायक रविंद्र खोमने, महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायिका अमिता घुगरी, कोकणचा महागायक सागर कुडाळकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना नुपूर जोशी, निवेदक किरण खोत असणार आहेत.
तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को ऑप सोसायटी पुरस्कृत रोटरी महोत्सव च्या प्रत्येक दिवशी भव्य लकी ड्राॅ सोडत विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
31 डिसेंबर रोजी इन्स्पायर सायकल पुरस्कृत दोन उपस्थित असलेल्या महाभाग्यवान विजेत्यांना हिरो कंपनीच्या सायकल देण्यात येणार आहेत.
रोटरी महोत्सवात 29 व 31 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपचे कलाकारांचे खास आकर्षण असणार आहे.
रोटरी महोत्सवात भव्य आटो एक्स्पो फोर व्हिलर व टू व्हिलर गाड्यांचे दालन सर्वांसाठी असणार आहे. याध्ये महिंद्रा, ह्युंडाई, एमजी , सिट्राॅन, बीवायडी, फोक्सव्हॅगन, सुझुकी, राॅयल एनफील्ड, टाटा, टोयाटो अशा विविध नामांकित कंपन्यांचा समावेश असणार आहे. स्थानिक कलाकारांचे ग्रुपडान्स सादरीकरण रोटरी महोत्सवात केले जाणार आहे.
रोटरी महोत्सवात नाममात्र प्रवेशिका रू 20 ठेवण्यात आली आहे.गेली अनेक वर्ष रोटरी क्लब ऑफ कुडाळ नववर्षाच्या स्वागतासाठी रोटरी महोत्सव चे भव्य आयोजन करित आहे. सुटसुटीत नियोजन व आकर्षक कार्यक्रम अशी रोटरी महोत्सवची ख्याती आतापर्यंत राहिलेली आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सर्व रोटरी सदस्य मेहनत घेत असतात. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कुडाळ, इंटरॅक्ट क्लब ऑफ कुडाळचेही सहकार्य रोटरी महोत्सवात मिळत असते. सिंधुदुर्गवासिंयांनी या महोत्सवला सहकुटुंब भेट द्यावी असे आवाहन रोटरी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष ॲड राजीव बिले यांनी केले. राजीव पवार यांनी आभार मानले.





