भाजपला देखील विजय खात्री, मिरवणुकीत डीजे वाजवण्यासाठी परवानगी मागण्यासाठी भाजप देखील तहसीलदार कार्यालयात

भाजपा व शहर विकास आघाडी दोघांनाही विजयाची खात्री
कुणाची विकेट पडणार, कोण विजयी ठरणार उद्या समजणार
कणकवली नगरपंचायत ची निवडणूक झाल्यानंतर या निवडणुकीच्या चर्चा या राज्यभर झाली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे देखील आता अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले असताना कणकवली शहर विकास आघाडी सोबत भाजपने देखील या निवडणुकीत निकालापूर्वीच विजयी रॅली मध्ये डीजे वाजविण्यासाठी परवानगी मागण्याकरिता तहसीलदार कार्यालय गाठले. आणि आपल्या विजयाचा शंभर टक्के खात्री असल्याचा दावा केला. कालच शुक्रवारी भाजपाच्या शहराध्यक्षांकडून कणकवली तहसीलदार कार्यालयात विजयी मिरवणुकी मध्ये डीजे वाजविण्याकरता परवानगी मागितली. मात्र अशा प्रकारची परवानगी दिली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शहर विकास आघाडी सोबत भाजपला देखील आपल्या विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचा सांगितले जाते. त्यामुळे आता उद्या लागणाऱ्या निकालामध्ये कुणाची विकेट पडणार व कोण विजयी ठरणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.





