अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

मसुरे प्रतिनिधी
कालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली मर्डे ७ रॅम्प, डांगमोडे १२ रॅम्प, कोईल ५ रॅम्प असे एकूण २४ रॅम्प महसूल पथकाने जेसीबी च्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.सदरची कारवाई करताना श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्यासह श्री.संतोष गुरखे मंडळ अधिकारी पोईप, श्री.एस.पी.लखमोड तलाठी बांदिवडे, श्री.डी.सी.ठाकूर तलाठी पोईप, श्री.वाय.ए.माळी तलाठी हिवाळे, श्री.एम.एस.काटे तलाठी असरोंडी, श्री.संतोष चव्हाण कोतवाल देऊळवाडा, श्री.सचिन चव्हाण कोतवाल मसुरे, श्री.विकास पोयरेकर कोतवाल त्रिंबक, श्री.संतोष नाईक कोतवाल पोईप हे या महसूल पथकामध्ये सहभागी होते.
महसूल विभागाची कार्यवाही या भागामध्ये पडणार याची आधीच कुन कून लागल्यामुळे या परिसरातील अनधिकृत वाळू उत्खलन करणाऱ्या सर्व होड्या या पथकाला आढळून आल्या नाहीत. याबाबत या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू उत्कलन होत असून या ठिकाणी जर पुन्हा अनधिकृत वाळू उत्खलन झाल्यास पुन्हा एकदा महसूल विभागाच्या वतीने कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या जमिनीमध्ये रॅम आढळून येतील त्या जमीन मालकांवरही सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती बोलताना मसुरे मंडल अधिकारी एस आर चव्हाण यांनी दिली.

error: Content is protected !!