कणकवली जाणवली मधील दत्त मूर्तीची धाडसी चोरी

घटनास्थळी जिवंत काडतुसांनी भरलेलं रिव्हॉल्वर व कटावणी सापडली

3 तारीख ला मंदिराची काही जणांकडून करण्यात आली होती रेकी

कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा तपास सुरू

कणकवली तालुक्यातील जाणवली कृष्णनगरी या ठिकाणी असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरांमधील धातूची मूर्ती आज शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. दरम्यान स्वयंभू दत्त मंदिराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती लंपास केली. मात्र मूर्ती लंपास करत असताना या ठिकाणी चोरट्यांकडे असलेले गावठी पाच काडतूस भरलेले रिव्हॉल्वर व कटावणी घटनास्थळीच टाकून सीसीटीव्ही चा सायरन वाजल्याने चोरटे घटनास्थळ वरून पळाले. घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली असून कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या सहित स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. पोलिसांकडून या घटनेची तपासासाठी पथके कार्यरत करण्यात आली असून चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील जानवली येथे महामार्ग लगत असलेल्या कृष्णनगरी या ठिकाणी हे स्वयंभू दत्त मंदिर 2019 मध्ये उभारणी करण्यात आले होते. या ठिकाणी असलेले मोहिते यांच्या खाजगी मालकीचे हे मंदिर असून मोहिते यांना घरातील एका खोलीमध्ये जमिनीत ही मूर्ती मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या ठिकाणी स्वयंभू दत्त मंदिराची उभारणी केली. दरम्यान
याबाबत ओंकार मोहिते यांनी कणकवली पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयीतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जुलै रोजी या मंदिराजवळ चौघे तरुण आले होते. यातील एकाने मोहिते यांना मला ओळखलं काय? असं विचारून या मंदिरात असलेल्या दत्त मूर्तीचे दर्शन देखील घेतले होते. तसेच या ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग करत फोटोही घेतले होते. त्यानंतर त्यांनी सदरची असलेली मूर्ती सोन्याची आहे का? अशी विचारणा केली असता मोहिते यांनी होय असे सांगितले अशी माहिती श्री जाधव यांनी दिली. त्यानंतर आज घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केले असता त्यामध्ये संशयित तिघेजण व तीन तारीख ला आलेल्या तरुणांशी साधर्म्य असलेले आढळत असल्याचेही श्री जाधव यांनी सांगितले. आज पावणे एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली. त्यावेळी कटवणीच्या साहाय्याने चोरट्याने गाभार्‍याचा दरवाजाला लावलेले कुलूप तोडून ही मूर्ती पळवली. मात्र याच दरम्यान सीसीटीव्ही ला कनेक्ट असलेला सायरन वाजल्याने मोहिते कुटुंबीय बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. व त्यानंतर काही वेळातच चोरटे तेथून पळाले. चोरट्याने गाडी महामार्ग लगत अलीकडे उभी करून ठेवली होती. घटनेची माहिती मिळतात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांसह कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच तसेच ठसे तज्ञ कडून देखील घटनेच्या ठिकाणचे ठसे घेण्यात आले आहेत. व श्वान पथकाने देखील घटनास्थळी काही ठिकाणी भेट देत तपास केला. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके प्रमोद काळसेकर कणकवली पोलीस स्टेशनचे पांडुरंग पांढरे विनोद चव्हाण यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल आहेत. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके करत आहेत.

error: Content is protected !!