बालमंदिर कनेडी प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप- “विजय क्रीडा मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम”

कणकवली/मयूर ठाकूर
कनेडी वार्ताहर- विजय क्रीडा मंडळ, साई हिल टी.पी.रोड भांडुप, मुंबई ७८ यांच्यावतीने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत बालमंदिर कनेडी,तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. बालमंदिर कनेडी ही प्रशाला ग्रामीण भागात असून या प्रशालेत जवळपास ५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना विजय क्रीडा मंडळाच्या वतीने स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.
विजय क्रीडा मंडळ ही एक निस्वार्थी सेवाभावी संस्था असून या संस्थेची स्थापना १९८९ साली झाली. या लहान रोपट्यापासून अवाढव्य वटवृक्ष बनवण्यात असंख्य अशा लहान थोर कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. आजमितीस लाखो तरुण या संस्थेची एकरूप होऊन संस्थेच्या जडणघडणीत समरस होत आहेत. विजय क्रीडा मंडळ दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सात दिवस अखंड, अविरत असे लोक सेवेचे कार्य सातत्याने करीत आहे. या मंडळाचे अध्यक्ष व मार्गदर्शक सन्मा.श्री.संतोष कासले हे निस्वार्थी वृत्तीने जनसेवा करत आहेत. या संस्थेच्या कार्याची कक्षा संपूर्ण जगभरात पसरून असंख्य सेवाभावी संस्थांसोबत एकत्र सेवाभावी कार्य करीत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर.एच. सावंत, सांगवे गावचे सुपुत्र व विजय क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते श्री. प्रसाद सावंत व इतर कार्यकर्ते तसेच माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, बालमंदिर कनेडी मुख्याध्यापिका ग्रेसी चोडणेकर, सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.