पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

वाहतूक शाखेत काम करताना कायद्याच्या अंमलबजावणी सोबत जनजागृतीचे ही महत्त्वपूर्ण काम
प्रकाश गवस यांचे सर्व स्तरातून केले जाते अभिनंदन
सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखे मधील पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. प्रकाश गवस हे सिंधुदुर्ग पोलीस दलातील बहुपरिचीत असे नाव असून, पोलीस म्हणून काम करत असताना कायद्याची अंमलबजावणी करत जनतेमध्ये जनजागृती व नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रबोधन करण्यामध्ये प्रकाश गवस यांची खास ओळख आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलात अनेक ठिकाणी काम करत असताना वाहतूक पोलीस म्हणून त्यांनी कणकवलीसह महामार्ग व अन्य ठिकाणी केलेले काम हे सर्वपरिचित आहे. महामार्गावर वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत असताना कायद्याच्या भाषेतून त्यांचे प्रबोधन करणे व जनजागृती करणे जेणेकरून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागून भविष्यात त्यांच्या हातून अपघात घडू नयेत किंवा नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता प्रकाश गवस यांचा आग्रह असतो. पोलीस दलामध्ये जिल्हाभरात काम करत असताना त्यांनी अनेक मित्रपरिवार जोडला आहे. वाहतूक शाखेमध्ये पोलीस म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रकाश गवस यांची महामार्ग पोलीस मदत केंद्र ओसरगाव या ठिकाणी बदली झाली आहे. श्री गवस यांना मिळालेल्या बढती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली