मंत्री नितेश राणे यांनी केली पंढरपूरची पायीवारी

वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारीत मंत्री नितेश राणे झाले सहभागी

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे आज वाखरी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पायी वारीत सहभागी होत पायी वारी केली. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे दर्शन घेतले तसेच रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खांद्यावर घेत मंत्री नितेश राणे यांनी पायीवारी केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विविध भागातून वारकरी भक्ती भावाने सहभागी होत असतात. पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले हे भक्तगण वारीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत पांडुरंग चरणी लीन होतात. अशा या भक्तीमय वातावरणात या पायी दिंडीत मंत्री नितेश राणे सहभागी झाल्याने वारकऱ्यांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वारकऱ्यांच्या वतीने मंत्री नीतेश राणे यांचा सत्कारही करण्यात आला.

error: Content is protected !!