पिरावाडी येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान

घराचे सिमेंट पत्रे उडून लाखाचे नुकसान
आचरा-अर्जुन बापर्डेकर
शुक्रवारी दुपारी आकस्मिक आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा पिरावाडी येथील सौ शलाखा विठ्ठलदास कादळगावकर याच्या राहत्या घराचे सिमेंट पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने सिलींगसह आतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.यात सिमेंट पत्रे .20
दोन रुम चे फॉल सिलिंग ,विद्युत उपकरण,लाईट फिटींग,बेड
कपडे लत्ते आदी मिळून सुमारे 1 लाख 20 हजार नुकसान झाले. याबाबत खबर मिळताच आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, ग्रामविकास अधिकारी पदमाकर कासले,ग्रामपंचायत सदस्या पुर्वा तारी,पोलीस पाटील सौ तन्वी जोशी,कोतवाल गिरीश घाडी यांसह ग्रामस्थ सायली सारंग,समिधा चौगुले, झहिर मुजावर, परेश तारी यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.
आचरा परीसरात पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्याचा फटका किनारपट्टी भागाला बसत आहे.