शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पितृशोक

भास्कर पारकर यांचे निधन

शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील व कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी भास्कर दिगंबर पारकर उर्फ भाई पारकर (वय 84) यांचे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. प्रकृती आस्वास्थ्य मुळे त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. मे 2025 मध्ये संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे निधन झाले होते. भास्कर पारकर यांच्या पाश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी 12.30 वाजता कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचे ते वडील होत.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!