ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावीचा निकाल 100% .

कणकवली/मयुर ठाकूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावी परीक्षेचा निकाल 100%,लागला असून कु.दिया जयराम प्रभुदेसाई 96.4 %आणि कु .गौरेश आनंद पारकर 96.4% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला ,कु मयुरेश श्याम सोनुर्लेकर यांने 95 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला कु. शार्दुल निलेश ठाकूर यांने 94 % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रशालेचे 90% गुण मिळवून 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ,तसेच 32 विद्यार्थी 80% च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत ,70 % ते 80% मध्ये 31 विद्यार्थी आहेत 8 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालाआहे, एकूण 83 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री .बुलंद पटेल ,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर ,खजिनदार सौ.शितल सावंत मॅडम सल्लागार डी.पी तानावडे सर ,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!