अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
अल्पवयीन युवतीवर अत्याचारप्रकरणी तालुक्यातील दिप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे याची अतिरीक्त सत्र न्यायाधिश जे. पी. झपाटे यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यातून सदरच्या अल्पवयीन युवतीवर अत्याचार केले होते. याबाबत दोघांच्याही घरी समजले होते. त्यावेळी देण्यात आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७४, ७५, ३५१ (२), पोक्सो कायदा ४, ६, ८, १२, व अॅट्रॉसिटी कायदा कलम ३ (१), (डब्ल्यू), (आर), (व्हीए) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला १० जून रोजी अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आरोपीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामिन अर्जावर सुनावणी होत ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर करतानाच एक महिना गावात प्रवेश करू नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, अशा अटी घातल्या आहेत.





