संजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळे ची NEET – २०२५ मध्ये चमकदार कामगिरी

अतिग्रे : NEET 2025 परीक्षेत उत्कर्षा हळींगळे या विद्यार्थीनीने ७२० गुणांपैकी ६३३ गुण मिळवून तसेच ऑल इंडिया रँक १९३ व कॅटेगरी रँक ४५ प्राप्त करून संपूर्ण देशात संजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीचे नाव उंचावले आहे .

तसेच संस्थेच्या सृष्टी कदम (६१५ गुण,ऑल इंडिया रँक ६२७), आदित्य फातले (६०६ गुण ,ऑल इंडिया रँक ९८६ ) ,श्रेया पवार (६०५ गुण ,ऑल इंडिया रँक १०३१ ) , विकास चौधरी (६०० गुण ,ऑल इंडिया रँक १३६९) यांचा समावेश आहे .

संस्थेच्या ०५ विद्यार्थ्यांनी ६०० तर १०७ विद्यार्थ्यांनी ५०० च्या वरती गुण मिळवून उच्चत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे .

या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक श्री वासु सर  म्हणाले कि ,  “ दूरदृष्टी  आणि दृढनिश्चय हि यशाची गुरुकिल्ली आहे ” .  

संस्थेचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!