सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध – सौ. संजना सावंत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरडवे कोकेवाडी शाळेच्या नूतन इमारत उद्घाटनाप्रसंगी सौ संजना सावंत यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरडवे कोकेवाडी या शाळेची नूतन इमारत वर्गखोली बांधण्यात आली सदर वर्गखोलीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. संजना सावंत मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर इमारत मंजूर होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री. संदेश सावंत साहेब यांचे विशेष योगदान लाभलेले आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी खरेदी विक्री संघ कणकवलीचे उपाध्यक्ष श्री.सुरेश ढवळ ,नरडवे सरपंच श्री. गणपत सावंत, उपसरपंच श्री. वैभव नार्वेकर, पंचायत समितीच्या माजी सदस्य राजश्री पवार, नरडवे गावचे माजी सरपंच सौ. अमित सावंत तंटामुक्ती अध्यक्ष नरडवे श्री. अंकुश सावंत, पोलीस पाटील श्री. संदीप कदम, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रणया मेस्त्री, श्री. विनोद बागवे, जमीनदाते श्री. उमेश सावंत, श्री. मनोहर सावंत, सामाजिक कार्यकर्ते श्री. सदानंद सावंत, नामदेव सावंत, रमाकांत सावंत, लक्ष्मण सावंत, एकनाथ सावंत, शशिकांत वंजारे, सुभाष मेस्त्री, श्री.शंकर सावंत, निलेश पवार, शाळा स्थापन समिती अध्यक्ष सानिका पवार, श्री. गणेश सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, केंद्रप्रमुख विजय भोगले, अंगणवाडी सेविका शीतल सावंत, सुप्रिया सावंत,नरडवे नंबर 1 से मुख्याध्यापक श्री. समीर पाटील, श्री. सुहास बंड, श्री के पी सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी कुमार आराध्य सुहास बंड, कुमार जयदीप श्यामसुंदर मेस्त्री, कुमारी श्रद्धा संतोष सावंत, कुमार अथर्व निलेश पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादित केल्याबद्दल सन्माननीय सौ संजना सावंत मॅडम आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला. तसेच शाळेसाठी जमीनदाते श्री. उमेश सावंत, श्री. मनोहर सावंत तसेच सर्व मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशाळेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी सन्माननीय श्री. संदेश सावंत, सन्माननीय सौ. संजना सावंत मॅडम यांनी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे नरडवे सरपंच श्री. गणपत सावंत यांनी ग्रामपंचायत स्तरावरून ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्यासाठीचे निधी उपलब्ध करून देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे आश्वासित केले. उज्ज्वल यशाबद्दल विस्तार अधिकारी श्री. कैलास राऊत यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक सौ. उमा सावंत मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुशांत मर्गज व आभार प्रदर्शन सौ. अक्षता बंड यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!