आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात

आचरा प्रतिनिधी

नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच या अपघात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले होते. तांच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार चालू होते. गोवा बांबूळी येथील उपचारनंतर ते सुखरूप घरी परतले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जखमी बिनसाळे यांच्या घरी जात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी दिलेली आर्थिक मदत बिनसाळे यांना सु्फूर्त केली आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाउपाध्यक्ष महेश राणे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, अभिजित सावंत, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, विजय कदम, चंदू कदम, अभय भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच आमदार निलेश राणे यांनी अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांची भेट घेत आर्थिक मदतीचा हात दिला होता.

error: Content is protected !!