सरंबळ इंग्लिश स्कुलचा १०० टक्के निकाल

कु. हर्षा महादेव तोंडवलकर प्रशालेतून प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबई संचलित सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ या प्रशालेचा एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100% लागला. यावर्षी प्रशालेतून २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून २१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
या परीक्षेमध्ये कु. हर्षा महादेव तोंडवलकर हिने 93.20% गुण मिळवत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. तसेच कु. आर्या संभाजी घाडी हिने 89.00% गुण संपादन करून द्वितीय क्रमांक तर कु. सोनल गुरुनाथ नाईक हिने 86.20% मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल होळकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था सरचिटणीस राजेंद्र परब, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखाचिटणीस प्रसाद साटम, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष योगेश नाईक, तसेच उपस्थित पालक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!