आचरा परीसराला मुसळधार पावसाचा फटका

पिरावाडी,वरचीवाडी भागात छप्पराचे पत्रे उडून नुकसान
आचरा-अर्जुन बापर्डेकर
बुधवार रात्री पासुन सोसाट्याच्या वारयासह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले . रात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे पिरावाडी येथील गणपती शाळेचे,तसेच आचरा टेंबली येथील हॉटेलच्या शेडचे सिमेंट पत्रे उडून नुकसान झाले आहे.विद्यूत मंडळालाही याचा फटका बसल्याने आचरा भागातील बराचसा भाग अंधारात बुडाला होता.
बुधवार रात्री पासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे.रात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा पिरावाडी येथील सुप्रसिध्द मूर्तिकार पवनकुमार पराडकर यांच्या मुर्तीशाळेचे ३५ सिमेंट पत्रे उडून गेले.तसेच चाळीस गणपती,१० गणपती साचा मिळून अंदाजे ७०हजाराचे नुकसान झाले.तर वरचीवाडी येथील हाँटेल व्यावसायिक
तुषार प्रभाकर परब यांच्या हाँटेल शेडचे सिमेंट पत्रे उडून अंदाजे 15हजाराचे नुकसान झाले.घटनेची खबर मिळताच सरपंच जेराॅन फर्नांडिस,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,उपाध्यक्ष परेश सावंत,यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली .नुकसानीचा पंचनामा तलाठी श्रीमती शिरसाठ, एस आर गणगे पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,सौ तन्वी जोशी, सुनील खरात,कोतवाल गिरीश घाडी यांनी केला.