तुतारी एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने कणकवली स्थानकात प्रवाशांचा खोळंबा

मडगावहुन नवीन इंजिन आल्यावर गाडी मार्गस्थ होणार

कोकण रेल्वे प्रशासनाकडून गाडीतील प्रवाशांना दिली जातेय माहिती

कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई वरून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेस चे इंजिन फेल झाल्याने तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्टेशन मध्ये थांबवून ठेवण्यात आली आहे. कणकवली रेल्वे स्टेशन मध्ये गेले काही तास तुतारी थांबवल्याने या रेल्वेतील प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान मोटरमन ने तुतारी मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काही अंतर जाऊन पुन्हा तुतारी एक्सप्रेसचे इंजिन बंद होत असल्याने अखेर मडगाव होऊन नवीन इंजिन मागविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे तुतारी एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तसेच यामुळे कोकण रेल्वेवर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली आहे. दरम्यान या रेल्वे मधील प्रवाशांना इंजिन फेल झाल्याने काही काळ विलंब झाल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे.

error: Content is protected !!