*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳* देवगड/चाफेड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले. या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते. साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.