संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या  दोन  विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड”  कंपनीमध्ये निवड

जयसिंगपूर:(प्रतिनिधी)  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील  इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’  कंपनीमध्ये निवड झाली आहे. या दोन्ही विध्यार्थ्यांना ३.०० लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. सिव्हील इंजिनीरिंग क्षेत्रात ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’  या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केलेला आहे.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी इस्न्टिट्यूटचे  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील,  सिव्हील विभाग समन्वयक प्रा. एम. बी. पाटील, संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी, अकॅडमीक डीन, प्रा. प्रशांत पाटील, सिव्हील  विभागप्रमुख प्रा. वंदना शहा यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!