आचरा जिल्हा परिषद मतदार संघात प्रचाराला वेग

महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते उदघाटन

आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी आणि आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शुक्रवारी आचरा येथील शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,आरपीआय महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुकाध्यक्ष विनायक बाईत,विभाग प्रमुख संतोष कोदे,जेरोन फर्नांडिस, मंगेश गावकर,जयप्रकाश परुळेकर, जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, पं स.उमेदवार गणेश तोंडवळकर,यांसह शिवसेनेचे मनोज हडकर,रुपेश पाटकर, संतोष मिराशी,भाऊ हडकर,मुझफ्फर मुजावर,पंकज आचरेकर,विजय कदम,उदय घाडी,अजित घाडी, राजन मेस्त्री यांसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!