हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघ जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनवणार!
भाजपाचे हरकुळ जि. प. चे उमेदवार मनोज रावराणे यांचा प्रचारादरम्यान मतदारांना विश्वास
भिरवंडे, गांधीनगर मध्ये भाजपाच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद
भाजपा हा पक्षच आपल्या भागाचा विकास करू शकतो. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन तसेच आमदार निलेश राणे हे देखील या विकासाच्या प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी आता पदावर आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात राणे कुटुंबीयांचे योगदान हे यापुढे अनेक वर्ष राहणार आहे. त्यामुळे विकासासाठी येथील जनता आमच्या पाठीशी उभी राहून या निवडणुकीत आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील याची आम्हाला खात्री आहे. हरकुळ बुद्रुक हा जिल्हा परिषद मतदार संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार असे उद्गार हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांनी काढले. हरकुळ बुद्रुक मतदार संघातील भिरवंडे, गांधीनगर भागामध्ये त्यांनी आज झंजावती प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची संख्या पाहता मनोज रावराणे व त्यांच्या सहित हरकुळ खुर्द पंचायत समितीचे उमेदवार बबलू सावंत यांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होईल असा विश्वास दस्तूरखुद्द मतदारांनी यावेळी व्यक्त केला आहे. या प्रचार फेरी प्रसंगी भिरवंडे गांधीनगर शक्तीकेंद्रप्रमुख श्रीकांत सावंत,सरपंच मंगेश बोभाटे,उपसरपंच राजेंद्र सावंत,माजी सरपंच शेखर सावंत,मिलिंद बोभाटे, गुरु सावंत,सोशल मिडिया प्रमुख सुधीर सावंत,बाबा सावंत, अमीर सावंत,अक्षय सावंत,हर्षद सावंत,गुरू शेटये,प्रथमेश सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनीता सावंत,मंगेश सावंत,निलेश सावंत,संदीप सावंत, छोटू सावंत,विष्णू सावंत,संतोष सावंत, शेखर राणे, भाई परब, बच्चू प्रभू गावकर, तीवरे माजी सरपंच भाई आंबेलकर आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली





