*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*
                विजय चौकेकर
कणकवली( वार्ताहर .)
       तथागत गौतम बुद्धांना मानवजातीला  बुद्धीवादी बनवायचे होते . माणूस बुद्धीवादी म्हणजेच विज्ञानवादी बनल्यास तो स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यास सिद्ध होईल . आणि  समाजात ज्या भ्रामक समजूती आहेत त्याचे उगमस्थानच नष्ट करेल . म्हणूनच बुद्धाचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवाद जीवनात आचरला तरच माणूस सुखी होईल . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा पियाळी यांनी पियाळी बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या *अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा* आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
     यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम , पियाळी बौद्ध विकास मंडळाचे सचिव तेजराम कदम , प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा मनाली कदम , सचिव चिंती कदम , ग्रामिण पियाळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख गौतम तांबे ‘ सचिव अंकुश कदम , सुधांश तांबे , राहुल कदम आदी उपस्थित होते .

     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले .
पियाळी बौद्ध विकास मंडळ गावशाखेचे  अध्यक्ष गौतम तोबे सर यांनी  विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले तर आता सेवानिवृत्तीचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि गावोगावी जाऊन  अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी आणि समाज घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरवित  असल्याचे सांगून  त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तांबे  सरांनी केले तर आभार  तेजराज कदम यांनी मानले
.

error: Content is protected !!