हरकुळ खुर्दच्या मतदारांनी भाजपच्या पाठीशी राहण्याचा केलाय निर्धार!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांची माहिती

मनोज रावराणे व चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांना मतदारांमधून मिळतोय प्रतिसाद

हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे व पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांचा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ हरकुळ खुर्द येथे श्री विठ्ठल मंदिर येथे करण्यात आला. हरकुळ खुर्द मध्ये या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला घरोघरी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदारांनी भाजपच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केल्याचे यावेळी मनोज रावराणे यांनी सांगितले. याप्रसंगी मनोज रावराणे यांच्यासह बबलू सावंत, हरकुळ खुर्द सरपंच श्री.राजन रासम,उपसरपंच सर्वेश दळवी,माजी सरपंच सुभाष दळवी,निलंबर रासम, दाजी रासम,शक्तीकेंद्रमुख राजेंद्र डीचवलकर,बूथ अध्यक्ष श्यामसुंदर रासम,आशुतोष रासम,जयप्रकाश हुले,सोसायटी चेअरमन अण्णा रासम,अविनाश रासम,ग्रामपंचायत सदस्य महेश दळवी,पांडुरंग रासम,गीतांजली रासम, दीपक रासम व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!