हरकुळ बुद्रुक मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करा!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांचे आवाहन

हरकुळ बुद्रुक मध्ये भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ

हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन उत्साहात करण्यात आला. यावेळी हरकुळ बुद्रुक मधील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही मनोज रावराणे यांनी दिली. हरकुळ बुद्रुक मधून आतापर्यंत जनतेने राणेंच्या पाठीशी राहत साथ दिली आहे. तशीच साथ या निवडणुकीत द्या व सर्वाधिक मताधिक्याने मला विजयी करा असे आवाहन श्री रावराणे यांनी केले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दिव्या दिनकर पेडणेकर, दिनकर उर्फ राजू पेडणेकर, बुलंद पटेल,बाबुल पटेल, चांदसाहब पटेल,अनिल खोचरे,लियाकत पटेल, जाकीर पटेल,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकात परब,पूनम तेली,तुकाराम खोचरे, बूथ अध्यक्ष इम्रान शेख,उमेश सापळे,मामा माणगावकर,मोहसीन शेख,निलेश तेली,सरफराज शेख, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक भाजपा नीसार शेख,अरबाज खान, रेहान शेख,भाजपा कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!