नेरुर येथे उद्या मोफत दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिर

एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकायनि ‘मोफत दंतमुख तपासणी व आरोग्य जनजागृती शिबीर आयोजि केले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर (जुने इंगेश हॉस्पिटल) शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी, सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. या शिबिरात एशियन कॅन्सर फाऊंडेशन चे नामांकित डॉक्टर-डॉ. सागर शर्मा(कर्करोग तज्ज्ञ),डॉ. श्रवण शेट्टी(कर्करोग तज्ज्ञ) हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. गरजू रुग्णांनी अगर लोकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्रा. प्रथमेश हरमलकर-9404923303.

error: Content is protected !!